Personal tools
 
You are here: Home Products Ganesh Chaturthi Ganesh 2010 गणेश चतुर्थीचे निसर्गावर होणारे परिणाम
Document Actions

गणेश चतुर्थीचे निसर्गावर होणारे परिणाम

निसर्गाचे संरक्षण करण्यासाठी, सर्वात उपयोगी पर्याय शोधण्यासाठी हे आवश्यक आहे की आपण गणेश चतुर्थी दरम्यान निसर्गावर होणारे परिणाम जाणून घेतले पाहिजेत.

हे परिणाम खालील मुद्यांद्वारे स्पष्ट होतात :-

· सर्वात जास्त पाण्याचे प्रदूषण, प्लास्टर ऑफ़ पेरिस च्या मूर्ती विसर्जन केल्यास होते.

· या मूर्तीमध्ये मिसळलेल्या रासायनिक रंगद्रव्यामुळे सुध्दा पाण्याचे जास्त प्रमाणात प्रदूषण होते.

· पूजेदरम्यान होणारा अशा प्रकारचा कचरा कि ज्याचे रिसायकलिंग होऊ शकत नाही, या कारणामुळे सुद्धा जास्त प्रमाणत पाण्याचे प्रदूषण होते.

· ध्वनी प्रदूषण

· यांचा उपभोग घेणारी लोकसंख्या


पाण्याचे प्रदूषण:

गेल्या वर्षां पासून असे सिद्ध झाले आहे की, पाण्याचे प्रदूषण सर्वात जास्त प्लास्टर ऑफ पैरिस (पी. ओ. पी) ने बनलेल्या मूर्तींना (दुर्गा, गणेश) विसर्जित केल्याने होत आहे.

या सर्व मूर्ती तलाव, नदी व समुद्रात विसर्जित केल्या जातात. ज्यामुळे दूषित पाण्याचा प्रश्न समोर येतो.

पी. ओ. पी. असा पदार्थ आहे, जो कधीही संपत नाही; ज्यामुळे वातावरणातील प्रदूषणाचे प्रमाण वाढण्याची शक्यात आहे.


प्लास्टर ऑफ पैरिस हा केल्शिम सल्फेट हेमी हायड्रेट (CaSO4, 1/2 H2O) आहे, जो जिप्सम, केल्शिम सल्फेट हायड्रेट, (CaSO4 , 2 H2O), हे पदार्थ कमी तापमानावर जाळून आणि नंतर याची बारीक पाऊडर बनवून बनवला जातो. पण ईको फ्रेंडली मूर्ती या चिक्कण मातीपासून (शाडू च्या मूर्ती) बनवल्या जातात, ज्या पाण्यात विसर्जन केल्यानंतर सहजपणे विरघळून जातात. पण याच मूर्ती जेव्हा रासायनिक रंगाने रंगवून विसर्जित केल्या जातात तेव्हा हे रासायनिक रंग पाण्यात मिसळून पाणी दूषित करून पाण्याचे प्रदूषण वाढवतात.


मूर्तींद्वारे होणाऱ्या पाण्याच्या प्रदूषणावर बंगलोर मध्ये केलेल्या अभ्यासानुसार असे स्पष्ट झाले आहे की:-

पाण्यात असलेल्या एसिडचे (अम्ली पदार्थ) प्रमाण वाढत आहे.

पाण्यात विरघळणाऱ्या घटक पदार्थाचे प्रमाण १००% ने वाढले आहे.

मूर्ती विसर्जनाच्या दिवसांमध्ये, दिवसा पाण्यात असलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण वाढते व रात्री कमी होते.

संभावित उपाय:

* अजैविक विघटन होणाऱ्या (नॉनबायोडीग्रेडेबल) वस्तूंचा वापर करणे टाळावे उदा: थरमाकॉल
* सर्व जैविक विघटन होणाऱ्या (बायोडीग्रेडेबल) वस्तूंना कंपोस्त करा
* फळांना पाण्यात विसर्जित करण्याऐवजी ते गरिबांना वाटा
* फुलांना पुनर्रनिर्माण (रीसायकल) करून त्यांचा परत वापर करा उदा: हस्त निर्मित कागद किंवा वाळलेल्या फुलांची ईतर उत्पादने.

 
 
 
Designed and managed
under EkDuniya initiative of
OneWorld
 
 

Powered by Plone CMS, the Open Source Content Management System

This site conforms to the following standards: