Personal tools
 
You are here: Home Products Ganesh Chaturthi Ganesh 2010 मूर्तीच्या सजावटीसाठी शोलापीठ वस्तू
Document Actions

मूर्तीच्या सजावटीसाठी शोलापीठ वस्तू

इकोएक्सिस्ट ने आपल्यासाठी गणेश मूर्तीच्या आरासासाठी लागणाऱ्या सुंदर वस्तू तयार केल्या आहेत ज्या पूर्ण पणे नैसर्गिक घटक "शोला" पासून बनवलेल्या आहेत.

आमच्याकडे गणेशाच्या मूर्तीसाठी हार, गुलाबाची फुले जी बंगाल मधल्या हस्त कारागीरांनी बनवली आहेत.

"शोलापीठ" हा एक पूर्णपणे नैसर्गिक घटक आहे जो थर्मोकॉल आणि प्लास्टिकला उत्तम पर्याय आहे, जे अजैविक विघटन होणारे पदार्थ आहेत ज्यामुळे प्रदूषण होते.

"शोलापीठ" हे काय आहे?

शोलापीठ (ज्याला "शोला" किंवा "इंडिअन कॉर्क असेही संबोधले जाते) हे दुधासारखे पांढरे मऊ लाकूड असते, ज्यावर नाजूक व सुंदर कारागिरी करून एक वस्तू बनवली जाते.

शोलापीठ हे भरपूर पाणी असलेल्या जमिनीत मोठ्या प्रमाणात उगवते.

शोला चे जैविक नाव एस्चीनोमीन इंडिका किंवा एस्चीनोमीन एस्पेरा असे आहे. (द्विदल) हे असे झाड आहे जे ठराविक पणे दलदल जमीन असलेल्या बंगाल, आसाम, ओरिसाया भागात उगवते.

शोलापीठ हा झाडातील वरील भाग आहे जो १ १/२ इंच व्यासाचा असतो.

परंपरेनुसार शोलापीठ हे हिंदू देवांच्या मूर्तींच्या सजावटीसाठी किंवा बंगाली विवाहात वर व वधूचे दागिने बनवण्यसाठी वापरले जाते. गेल्या काही वर्षांत शोलापीठ पासून बनवलेल्या हस्तानिर्मित वस्तू घर सजावटीसाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात.

बरचसे थर्मोकॉल सारखे असणारे (थर्मोकॉल जे अनैसर्गिक रित्या बनवले आहे), शोलापीठ हे थर्मोकॉल पेक्षा जास्त उत्तम आहे जे जास्त मऊ, उत्तम पोत, अधिक चमक व सहज रित्या वळवता येण्यासारखे आहे.

 
 
 
Designed and managed
under EkDuniya initiative of
OneWorld
 
 

Powered by Plone CMS, the Open Source Content Management System

This site conforms to the following standards: